वाढतं वजन कमी कसं करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..
जर सकाळी उठताच तुम्ही काही ठराविक भाज्यांचे रस प्यायलात तर त्यामुळे वजन कमी होऊ शकते, असं काही एक्सपर्ट सांगतात.
पालक आणि आवळा यांचा एकत्रित रस प्यायल्यास व्हिटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे मेटाबॉलिझम चांगले होते.
कमी कॅलरी आणि भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स असणारा टोमॅटोचा रस बेली फॅट कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.
भोपळ्याच्या रसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरी कमी असतात. त्यामुळे वजनही कमी होते आणि दिवसभर उत्साह टिकून राहातो.
व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असणारा कारल्याचा रस वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.