हळूहळू किडनी खराब करणाऱ्या ३ वाईट सवयी

आपल्या काही सवयी अशा असतात ज्या नकळतपणे आपल्या किडन्यांवर वाईट परिणाम करत जातातं.

त्यामुळे किडन्या खराब होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच किडनीचं आरोग्य जपायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी..

आपल्याकडे लहानसहान दुखण्यांसाठीही लगेचच पेनकिलर घेतल्या जातात.

त्याचा वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होत जातो. त्यामुळे सगळ्यात आधी डाॅक्टरांचा सल्ला न घेता मनानेच पेन किलर घेणे पुर्णपणे बंद करायला हवे.

आजकाल हर्बल सप्लिमेंट्स घेण्याचा खूप ट्रेण्ड आहे. पण हे सप्लिमेंट्स कधीही मनाने घेऊ नका. कारण त्यांच्यामध्येही किडनीवर वाईट परिणाम करणारे काही घटक असतात. 

रक्तातील साखर नेहमीच वाढलेली असणेही किडनीसाठी चांगले नाही. त्यामुळे शुगर नेहमीच कंट्रोलमध्ये राहील याची काळजी घ्या. 

Click Here