पौष्टिक आणि मस्त असा मेथी पराठा करण्यासाठी पाहा काय करायचे.
मेथीचे पराठे हा नाश्त्यासाठी तसेच डब्यासाठी एकदम मस्त पदार्थ आहे. करायला सोपा असतो. तसेच पौष्टिक असा पदार्थ आहे.
मेथीचा पराठा करताना काही टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तो छान खमंगही होईल आणि जास्त काळ टिकेल.
मेथीचा पराठा करताना त्यात थोडे पांढरे तीळ घालावेत. त्यामुळे मेथीचा पराठा जास्त पौष्टिक होतो. आहारात पांढरे तीळ असणे आरोग्यासाठी चांगले असते.
पराठ्याचे पीठ मळताना तेल घालू नका. त्याऐवजी गरम तूप घाला. पराठा जास्त खमंग होतो. तसेच तेलापेक्षा तूप वापरणे अधिक पौष्टिक.
मेथी जास्त बारीक चिरायची नाही कारण मेथी एकदम बारीक झाल्यावर कडवट लागू शकते. त्यामुळे पराठा करण्यासाठी मेथी हलकीच चिरायची.
पराठा करताना पिठात थोडे जिरे घालायचे. तसेच आवडत असल्यास थोडी कोथिंबीर घालायची. त्यामुळे चव संतुलित होते.
मेथी पराठा लाटताना जरा मध्यम लाटावा. जास्त मोठा केला तर तो कडक होतो. तसेच एकदम पातळ न लाटता जरा जाडसर लाटा. म्हणजे जास्त वेळ मऊ राहतो.