डोसा इडली सांबार चटणी-चटणी! खा ७ प्रकार

डोसा ते अप्पम सगळे प्रकार मस्तच. पाहा कोणते आहेत. 

डोसा म्हणजे फक्त मसाला डोसा, म्हैसूर डोसा एवढेच नसते. सारख्याच पीठाचे केले जातात विविध पदार्थ. 

डोसा हा नाश्त्यासाठी अगदी आवडीने केला जाणारा पदार्थ आहे. डोसा हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे मात्र भारतात सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. 

फार कमी ठिकाणी अप्पम मिळतो. मात्र हा मऊ पदार्थ फारच चविष्ट आणि पोटभरीचा आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी मिळतो. 

महाराष्ट्रात खास करुन कोकणात आंबोळी आवर्जून केली जाते. आंबोळीचे पीठ डोशापेक्षा जरा वेगळे असते. मात्र अनेक जण सारखंच पीठही वापरतात. 

कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून केला जाणारा उत्तपा हा पदार्थही फार लोकप्रिय आहे. उत्तप्पा डोश्यापेक्षा जाड असतो आणि मऊ असतो.

घावन म्हणा किंवा घावणे, हा पदार्थ कोकणात आणि महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. नाश्त्यासाठी चहासोबत घावणे आणि चटणी हा बेत रविवारी घरोघरी केला जातो. 

नीर डोसा फार चविष्ट आणि हलका पदार्थ आहे. नीर म्हणजे पाणी. पाण्यासारखे पातळ पीठ याचे भिजवले जाते. करायला सोपा आहे आणि पौष्टिकही. 

लोणी बेन्ने डोसा हा आजकाल फार चर्चेत असलेला पदार्थ आहे. बेन्ने म्हणजे बटर किंवा लोणी. हा लहान मऊ असा डोश्याचा प्रकार  फार चविष्ट असतो.

Click Here