Join us  

रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी आदित्य नारायणाला अटक व जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 1:54 PM

1 / 5
सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणला वर्सोवा पोलिसांनी सोमवारी (12 मार्च) अटक केली होती. निष्काळजीपणे गाडी चालवत एका रिक्षाला धडक देऊन महिलेला जखमी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.
2 / 5
वर्सोवा परिसरात आदित्य नारायणने स्वतःच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा चालक आणि प्रवासी महिला गंभीर जखमी झाली.
3 / 5
सोमवारी (12 मार्च) संध्याकाळी लोखंडवाला बॅक रोडच्या इंद्रलोक सोसायटीसमोर हा प्रकार घडला.
4 / 5
सुरेखा शिवेकर (वय 32 वर्ष) आणि रिक्षाचालक बाबुराव पालेकर (वय 64 वर्ष) अशी जखमींची नावं आहेत.
5 / 5
आदित्य नारायण अशा पद्धतीनं वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने एका खासगी एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याला धमकावत शिवीगाळ केली होती.