Join us  

आज सुपरमूनचं होणार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 2:50 PM

1 / 5
नूतन वर्षारंभी १ जानेवारी रोजी सोमवारी रात्री सर्वांना ‘सुपरमून’चे दर्शन होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली. (फोटो- अमोल मचाले)
2 / 5
सोमवारी (1 जानेवारी) सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पौष पौर्णिमा सुरू होईल. चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लक्ष ८४ हजार किलोमीटर दूर असतो.
3 / 5
पौर्णिमेला जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. अशा वेळी चंद्रबिंब नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त प्रकाशित दिसते.
4 / 5
सोमवारी चंद्र पृथ्वीपासून तीन लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येत आहे. त्यामुळे आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे.
5 / 5
सोमवारी चंद्र पृथ्वीपासून तीन लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येत आहे. त्यामुळे आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे.
टॅग्स :Supermoonसुपरमून