Join us  

हे आहेत मुंबईतील सर्वात महागडे बंगले, किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2018 1:57 PM

1 / 6
मुकेश अंबानी यांचा अँटेलिया हा बंगला चांगलाच लोकप्रिय आहे. या बंगल्याची किंमत ६७०० कोटी रुपये आहे. हा मुंबईतील सर्वात महागडा बंगला आहे. या बंगल्यात अत्याधुनिक सुविधा असून यावर हेलिपॅडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अंबानी यांचा २७ मजली अँटेलिया बंगला फोर्ब्सच्या महागड्या घरांच्या यादीत अव्वल आहे. अँटेलियावर झालेल्या खर्चात व अन्य घरांतील खर्चात मोठी तफावत आहे. अँटेलियावर १ अब्ज डॉलर (५९ कोटी ५० लाख रुपये) ते २ अब्ज डॉलर खर्च झाल्याचा अंदाज आहे. २००८ मध्ये या घराची किंमत २२२ दशलक्ष डॉलर होती. (Image Credit : The Quint)
2 / 6
शाहरूख खान याने मन्नत हा बंगला विकत घेतला होता तेव्हा त्याची किंमत १५ ते २० कोटी इतकी होती. आता या बंगल्याची किंमत २ हजार कोटी सांगितली जाते. हा बंगला मुंबईतील तिसरी सर्वात महागडी प्रॉपर्टी असल्याचे म्हटले जाते. ६ हजार स्केअर फूटात पसरलेल्या या बंगल्यात जिम, स्विमिंग पूल अशा सर्वच सुविधा आहेत. (Image Credit : The Quint)
3 / 6
जाटिया हाऊसजवळच असलेला आणखी एक आयकॉनिक बंगला म्हणजे मेहरांगिर हाऊस..भारतीय शास्त्रज्ञ होमी जे भाभा यांचा हा बंगला आहे. त्यामुळे या प्रॉपर्टीचं म्युझियम करण्यात यावं अशी अनेकांची इच्छा आहे. या बंगल्याची किंमत ३७२ कोटी असून १५ हजार स्केअर फूटाची ही प्रॉपर्टी आहे. हा बंगला स्मिता क्रिष्णा गोदरेज यांना ३७२ कोटी रूपयांना विकण्यात आला आहे. ११५ कोटी जास्त पैसे देऊन हा बंगला खरेदी करण्यात आला आहे. (Image Credit : The Quint)
4 / 6
मुंबईतील या बंगल्याची किंमत ४२५ कोटी रूपये इतकी असून ३० हजार स्केअर फूट इतकी ही प्रॉपर्टी आहे. ‘जाटिया हाऊस’ ही मलबार हिल परिसरातील एक महागडी प्रॉपर्टी आहे. आता ही प्रॉपर्टी कुमार मंगलम बिर्ला यांनी विकत घेतली आहे. (Image Credit : The Quint)
5 / 6
महिंद्रा ग्रुपने हा गुलिस्तान बंगला २७० कोटी रूपयांना विकत घेतला आहे. नेपियन सी रोडवर असलेल्या या बंगल्यात आनंद महिंद्रा यांचा जन्म झाला होता आणि ही डिल होईलपर्यंत या बंगल्यात ते भाडेकरू म्हणून राहत होते. त्यानंतर त्यांनी हा बंगला २७० कोटी रूपयांना विकत घेतला. १३ हजार स्केअर फूट जागेत हा बंगला आहे. (Image Credit : The Quint)
6 / 6
लिंकन हाऊस हा बंगला सुद्धा मुंबईतील सर्वात महागड्या प्रॉपर्टीपैकी एक आहे. यूएस काऊन्स्युलेट म्हणूनही हा बंगला प्रसिद्ध आहे. हा बंगला पूनावाला ग्रुपचे चेअरपर्सन सायरस पूनावाला यांनी विकत घेतला आहे. हा जुना बंगला विकण्याचा पूनावाला यांचा कोणताही प्लॅन नाहीये. या बंगल्याची रिडेव्हलपमेंट करण्यासाठीही अनेक अडचणी आहेत. त्यामुळे साधारण ५० हजार स्केअर फूटाची ही जागा ते केवळ परिवाराच्या राहण्यासाठीच वापरणार आहेत. या बंगल्याची किंमत 750 कोटी असल्याची माहीती The Quint ने दिली आहे. (Image Credit : The Quint)
टॅग्स :MumbaiमुंबईAjab Bungalowअजब बंगला