Join us  

​​विना वातानुकूलित शयनयान एसटी आली रं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 9:29 PM

1 / 6
राज्याची जीवनवाहिणी असलेली एसटी सध्या कात टाकत आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जानेवारी २०१८ रोजी आगामी वर्षात १ हजार विना वातानुकूलित शयनयान महामंडळात दाखल होतील, अशी घोषणा केली होती.
2 / 6
या धर्तीवर पहिली प्रोटोटोईप शयनयान एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी तयार आहे
3 / 6
पुण्याच्या मध्यवर्ती कार्यशाळेत या बसची बांधणी करण्यात आली. २ बाय१ अशा स्वरुपात ३० आसनांची क्षमता या बस मध्ये आहे.
4 / 6
पुण्यातील सीआयआरटी संस्थेने मंजूरी दिल्यानंतर प्रवासी सेवेत या बस चालवण्यात येतील
5 / 6
सध्या रातराणीच्या ६०० बस राज्यात धावत आहेत.रातराणीच्या जागेवर नवीन एसटी धावणार आहे
6 / 6
सध्या तरी रातराणीचेच तिकिट दर शयनयानसाठी आकारले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.