Join us  

Sushant Singh Rajput Suicide: सुशांत राजपूतच्या आयुष्यातील शेवटचे ३ तास कसे होते? सकाळी सर्वकाही ठीक होतं पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 9:06 PM

1 / 10
सुशांत सिंग राजपूत हे नाव घेताच डोळ्यासमोर हसणारा एक लाजाळू चेहरा दिसतो. त्याने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु तो बर्‍याच काळापासून नैराश्यग्रस्त होता असं सांगण्यात येत आहे.
2 / 10
सुशांत याच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरु होते, त्याचे औषधही तो घेत होता. सुशांतने आपल्या आयुष्यातील शेवटचे ३ तास तणावात घालवले. आज सकाळी साडेसहा वाजता त्याला जाग आली तेव्हा कोणीही असा विचार केला नसेल की, आजची सकाळ त्याची अखेरची असेल.
3 / 10
सुशांतने ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी घरात सुशांतसह काही अन्य लोकही उपस्थित होते, सुशांतसह त्याच्या घरी जेवण बनवणारा, क्रिएटिव्ह मॅनेजर आणि अन्य एक सदस्य हजर होता. तो सकाळी ठीक होता असं त्याच्या मित्राने सांगितले.
4 / 10
रिपोर्टनुसार सकाळी साडेसहा वाजता सुशांत झोपेतून उठला, घरातील नोकराने साडे नऊच्या सुमारास त्याला अननसाचा ज्यूस रुममध्ये जाऊन दिला. त्यानंतर सुशांत आपल्या बहिणीशी बोलत होता, त्यानंतर तो बेडरुममध्ये गेला आणि आतून दार बंद करुन घेतले.
5 / 10
जेवणासाठी नोकराने त्याचा दरवाजा ठोठावला, पण तो बाहेर आला नाही, मॅनेजरने सुशांतच्या बहिणीला कॉल लावला. बहीण आल्यानंतर चावीवाल्याला बोलावून दार उघडण्यात आले, पण रुममध्ये समोरचा नजारा पाहून सर्वांनाच धक्का बसला.
6 / 10
सुशांतचा मृतदेह पाहून कोणालाच विश्वास बसला नाही की, सुशांत आता या जगात नाही. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान झाली असं सांगण्यात येते.
7 / 10
सुशांतचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, त्यानंतर नोकराने पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली, त्यांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. चार दिवसांपूर्वी सुशांतची मॅनेजर दिशा हिचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता.
8 / 10
मुकेश भट्ट सुशांतच्या आत्महत्येविषयी टाइम्स नाऊ टीव्ही चॅनेलवर बोलले. मुकेश भट्ट म्हणाले की,'तो माझ्याकडे आला होता. मी त्याच्याशी बोललोही होतो, त्याच्या बोलण्यातून मला जाणवले की तो अस्वस्थ आहे. मग मला समजले की, त्याच्याबरोबर काहीतरी चुकीचे घडत आहे. आम्ही 'सडक 2' मध्ये एकत्र काम करण्याचा विचार करत होतो.
9 / 10
अभिनेता म्हणून छाप पाडलेल्या सुशांतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये यादगार भूमिका केल्या होत्या. मात्र त्यापैकी खास ठरली होती ती महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक असलेल्या एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरीमधील धोनीची भूमिका होती.
10 / 10
काही महिन्यांपूर्वी सुशांतचा ‘छिछोरे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात आत्महत्या करणे आयुष्यावरचा तोडगा नाही, असा संदेश सुशांतने दिला होता. आत्महत्या न करण्याचा संदेश देणा-या याच सुशांतने आज आत्महत्या करत जीवन संपवले, हा एक दुर्दैवी योगायोग म्हणावा.
टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्या