Join us  

सुनील पाटीलचा खळबळजनक दावा; आर्यन प्रकरणात वेगळ वळण, राष्ट्रवादी संबंधांवरही खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 5:20 PM

1 / 10
गेले अनेक दिवसांपासून आर्यन खान प्रकरणात वेगवेगळी नावं समोर येत होती. यात सुनील पाटील यांचंही नाव समोर आलं होतं. सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत असा दावा भाजपा नेते मोहित भारतीय(Mohit Bhartiya) यांनी केला होता.
2 / 10
नवाब मलिकांनीही सुनील पाटीलचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आता सुनील पाटील सगळ्यांसमोर येत या प्रकरणी खुलासे केले आहेत. मी कुठलीही टीप दिली नव्हती. मी या प्रकरणाचा मास्टर माईंड नाही. मला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील नीरज यादव यांनी ही टीम मनीष भानुशालीला दिली. मी आणि मनिष तेव्हा अहमदाबादला होतो. क्रुझवर मोठंमोठी माणसं जाणार आहेत अशी माहिती आली.
3 / 10
मी समीर वानखेडे यांच्याशी संपर्कात नव्हतो. १ तारखेला आमच्याकडे माहिती आली होती. मला या भानगडीत पडायचं नाही असं मी सांगितले होते. समीर वानखेडे माझा मित्र नाही, माझा NCB शी संपर्क नाही. फक्त रेड पडली त्यादिवशी मी समीर वानखेडेंना अभिनंदन इतकाच मेसेज पाठवला.
4 / 10
१ तारखेला गांधीनगर मंत्रालयात किरण आणि मनीष भानुशाली गेले होते. मनीषला मी फोन केला तो अधिकाऱ्यांसोबत बसला होता. मनीष आणि नीरज यादवचं बोलणं झालं होतं. मला या भानगडीत पडायचं नव्हतं. टीप देण्याचा माझा उद्योग नाही.
5 / 10
पण सॅमशी माझी ओळख होती. १ वर्षापूर्वी विजय ठाकूर या कॉमन फ्रेंड्च्या माध्यमातून ओळख झाली. ४ महिन्यापूर्वी सॅमने मला NCB ने पाठवलेली नोटीस पाठवली. मला मदत करशील का? असं त्याने विचारले. त्याने मला पैशांची मदत मागितली पण माझ्याकडे पैसे नव्हते. सॅमचा नंबर मी मनीष भानुशाली आणि किरणला दिला. माझा यात काहीही संबंध नाही.
6 / 10
सॅमने NCB अधिकाऱ्यांना २५ लाख देऊन आलो. माझं त्या प्रकरणातून नाव काढल्याचं सॅम म्हणाला. सॅमचा नंबर मी किरण आणि मनीषला दिला होता इतकाच माझा संबंध आहे. पैशाच्या देवाणघेवाणीबद्दल काहीच माहिती नाही. सॅम आणि किरण एकमेकांना ओळखत नव्हते.
7 / 10
मी अहमदाबादला होतो तेव्हा सॅम, किरण, मनीष हे एकत्र होते. छापेमारीनंतर मला किरणनं सेल्फी पाठवला. शाहरुखचा मुलगा आर्यन खानसोबतचा हा सेल्फी होता. काही सेटिंग होते का बघं असं म्हणाला पण मी बोललो माझी काही ओळख नाही. तुमचं तुम्ही बघा. मी किरण गोसावी आणि सॅम यांची एकमेकांशी ओळख करून दिली होती. सॅमनं माझ्या भरवशावर किरणला ५० लाख रक्कम दिले होते. तेवढीच माझा सहभाग होता.
8 / 10
१९९९ पासून मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत होतो. २०१६ पर्यंत मी सक्रीय होतो. त्यानंतर कुठल्याही पक्षात सक्रीय नाही. ऋषी देशमुख याला ओळखत नाही. नवाब मलिकांसोबत मी १० ऑक्टोबरला पहिल्यांदाच बोललो. याआधी कधीही मलिकांना भेटलो नव्हतो. मोहित कंबोज यांनी CCTV समोर आणावेत.
9 / 10
माझ्यावर विविध आरोप होऊ लागले, जीवाला धोका निर्माण झाला. अहमदाबाद येथून दिल्लीला गेलो त्यानंतर मला दिल्लीला मारण्याचा प्रयत्न झाला. धवल भानुशाली, मनीष भानुशाली यांनी मारण्याचा प्रयत्न केला. स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी दबाव आणण्यात आला.
10 / 10
मला गुजरातमध्ये मारुन फेकून देतील म्हणून मी मुंबईत आलो. भाजपाच्या बड्या बड्या नेत्यांना भेटून तुला सुरक्षित करू असं सांगितले गेले. कुठे जाऊ नकोस असंही बजावण्यात आलं होतं. परंतु मी जीव वाचवून मुंबईत आलो. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सुनील पाटीलनं हा दावा केला आहे.
टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोnawab malikनवाब मलिकMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी