Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन यांची मुंबईभेट

By admin | Updated: April 10, 2016 00:00 IST

1 / 8
सोमवारी ११ एप्रिल रोजी प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन दिल्लीला रवाना होणार आहेत. १२ एप्रिलला पंतप्रधानांनी दोघांसाठी लंच आयोजित केलं आहे.
2 / 8
प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांनी वाळकेश्वर येथिल रामकुंड नगरमधील झोपडपट्टीला भेट दिली त्यावेळी त्यांनी बाणगंगा तलावात पुष्प वाहिले
3 / 8
प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन यांचा बॉलिवूडच्या कलाकारांसोबत डिनरचा कार्यक्रम आहे.
4 / 8
क्रिकेट खेळल्यानंतर प्रिन्स विल्यम्स केट मिडल्टन यांनी मुलासोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला
5 / 8
ओव्हल मैदानावर प्रिन्स विल्यम्स केट मिडल्टन आणि सचिन तेंडुलकर यांनी भेट दिली. यावेळी तेथे मुले खेळत होती. त्यांना खेळताना पाहून पिन्स आणि राजकुमारीलाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही बॅट हातात घेऊन मुलांसोबत खेळण्याचा आनंद लुटला.
6 / 8
इंग्लडचे प्रिन्स विल्यम्स आणि डचेस केट मिडल्टन यांनी मुंबईतील ओव्हल मैदानवर क्रिकेटचा आनंद लुटला. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होता.
7 / 8
मुंबईतल्या ताज हॉटेलला भेट देत त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच हॉटेल ताजमधील कर्मचाऱ्यांशी बातचीतही केली.
8 / 8
इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन पहिल्यांदाच सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. रविवारी सकाळी ते मुंबईत दाखल झाले. दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. (सर्व फोटो लोकमतचे छायाचित्रकार सुशिल कदम यांनी घेतलेले आहेत)