1 / 8पावसात भिजण्याची हौस सगळ्यांना भागवता येत नाही. पण चार थेंब अंगावर घेण्याचा सोस कुणाला चुकलाय का?2 / 8एरवी धुळीने माखलेले रस्ते पावसाने धुतले आणि आरशासारखे लखलखीत केले.3 / 8मुंबई ठप्प झाली असली तरी अनेकांनी बंद काचांमागून पावसाचा आनंद लुटला.4 / 8पाऊस असो वा ऊन... पोटाची खळगी भरण्यासाठी गरीबांना हात पुढे करावाच लागतो...5 / 8क्वीन्स नेकलेस किंवा मरीन ड्राइव्हचा कट्टाही पाण्याखाली गेला.6 / 8गेट वे ऑफ इंडियाजवळ लाटा अंगावर घेण्यासाठी मुंबईकरांनी धाव घेतली. पोराटोरांनी तर विहीरीत माराव्या तशा उड्या समुद्रात मारल्या.7 / 8१५ दिवसांत पडणारा पाऊस एकाच दिवशी पडला आणि उन्हाची लाही लाही थांबली. पावसाचं आगमन साजरा करण्याचा हा एक अनोखा प्रकार.8 / 8शुक्रवारी १९ जून मुंबईकर जागा झाला तोच पावसाचा तडाखा झेलत. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी दिनी मुंबई बंद करून दाखवली ती वरुणराजाने. या ओलेत्या मुंबईच्या वेगवेगळ्या छटा टिपल्या आहेत पुरुषोत्तम चव्हाण यांनी...