Join us

मंगेश पाडगावकर पंचत्वात विलीन

By admin | Updated: December 30, 2015 00:00 IST

1 / 7
२०१३ मध्ये पद्मभूषणने त्यांचा गौरव करण्यात आला होता. याशिवाय महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कारही त्यांना मिळालं होता. त्यांनी २०१० मध्ये विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
2 / 7
मंगेश पाडगावकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
3 / 7
मंगेश पाडगावकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे.
4 / 7
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंगेश पाडगावकर यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करुन अंतिम दर्शन घेतले.
5 / 7
मंगेश पाडगावकर यांना पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.
6 / 7
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्यावर बुधवारी (३० डिसेंबर) संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ८६ व्या वर्षी पाडगावकर यांनी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
7 / 7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन अंतिम दर्शन घेतले. (फोटो : सुशील कदम)