Join us  

मुंबई: हार्बर रेल्वे मार्गावर लोकलचे 6 डबे रूळांवरून घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 5:31 PM

1 / 6
हार्बर रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी लोकलचे ६ डबे रूळांवरून घसरले.
2 / 6
सकाळी पावणेदहाच्या सुमारास माहीमजवळ ही दुर्घटना घडली.
3 / 6
ही लोकल सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जात होती. लोकलचे डबे माहिमजवळ ट्रॅक क्रॉस करताना रुळावरुन घसरले.
4 / 6
ही लोकल ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार होती, त्यासाठी ७ नंबरच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ट्रॅकवरुन ५ नंबरच्या ट्रॅकवर जाताना लोकलचे सहा डबे रुळांवरून खाली घसरले.
5 / 6
यात एका महिलेसह सहा प्रवासी जखमी झाले आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
6 / 6
गणेश चतुर्थीमुळं सुट्टीचा दिवस असल्यानं लोकलला फारशी गर्दी नसली तरी लोकल गाड्यांमधून गणपती घरी आणणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे