Join us  

मुंबईच्या रस्त्यावर खड्डा नव्हे तर भगदाड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 7:54 PM

1 / 6
मुंबईच्या मालवणी येथून जाणा-या मुख्य रस्त्यावर आज अचानक मोठे भगदाड पडले.
2 / 6
आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मालवणीत गेट क्रमांक एक जवळचा मुख्य रस्ता अचानक खचला.
3 / 6
आधीच वाहतुकीची प्रचंड कोंडी असणाऱ्या या रस्त्यावर हा खड्डा पडल्याने स्थानिकांना त्याचा प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला.
4 / 6
हा विभाग मुंबई महापालिकेच्या पी उत्तर विभागात मोडतो.
5 / 6
या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या सूचना पोलिसांकडून गाडी चालकांना दिल्या जात होत्या.
6 / 6
भगदाड पडल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता बॅरिकेड लावण्यात आले.