Join us  

महाराष्ट्राच्या मदतीला केरळ, कोविड रुग्णालयासाठी १०० डॉक्टर्स अन् नर्सेस मुंबईत येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 2:19 PM

1 / 10
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजपर्यंत ६७,६५५ एवढी रुग्णसंख्या झाली आहे. तर २९,३२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
2 / 10
राज्य सरकारने आता लॉकडाऊन शब्द हटवून मिशन बिगेन अगेन म्हणत सर्वकाही सुरु करायला सुरुवात केली आहे
3 / 10
तरीही राज्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट व सिनेमागृहांना बंदी घालण्यात आली आहे
4 / 10
राज्यातील विशेषता मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय स्टाफची कमतरता भासत असल्याचे दिसत आहे.
5 / 10
कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबईतील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, येथील वैद्यकीय केंद्रांना सहकार्य करण्यासाठी केरळहून १०० डॉक्टरा व नर्सेसची फौज महाराष्ट्रात येणार आहे.
6 / 10
तिरुवअनंतपूरम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधीक्षक डॉ. संतोष कुमार यांनी याबाबत माहिती दिली. १६ डॉक्टर्संची टीम आजच मुंबईत दाखल होणार आहे. तर पुढील काही दिवसांत ५० ते १०० डॉक्टर्स व नर्सच टीम मुंबईत दाखल होणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले
7 / 10
संतोषकुमार हे केरळमधील सरकारी रुग्णालयात सेवा बजावत आहे, पण सध्या दोन डॉक्टरांसह ते मुंबईत दाखल झाले असून सेव्हन हील्स हॉस्पीटलमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
8 / 10
कोरोनाचे वाढते रुग्ण आणि डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन केरळहून ५० डॉक्टर्स आणि १०० नर्सेस बोलावण्यात आल्याचे यापूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहेल यांनी सांगितले होते. तसेच राज्यातील अन्य भागातील रुग्ण आता बरे होत असल्याने लातूर, सध्या वर्धाहून ४५ डॉक्टर्स मुंबईत आले आहेत.
9 / 10
कोरोनाचे वाढते रुग्ण आणि डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन केरळहून ५० डॉक्टर्स आणि १०० नर्सेस बोलावण्यात आल्याचे यापूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहेल यांनी सांगितले होते. तसेच राज्यातील अन्य भागातील रुग्ण आता बरे होत असल्याने लातूर, सध्या वर्धाहून ४५ डॉक्टर्स मुंबईत आले आहेत.
10 / 10
लातूर आणि अंबाजोगाईहून प्रत्येकी ५० असे १०० डॉक्टर्स येत आहेत. मुंबईत ५० आयुर्वेदिक तर खासगी क्षेत्रातील २५० डॉक्टरांनी सेवा देण्याचे मान्य केले आहे. बीकेसीमधील १००० बेडचे व नॅस्को मधील ५५० बेडचे दोन्ही हॉस्पिटल १०० बेडच्या क्षमतेने सोमवारपासून सुरू होणार आहेत
टॅग्स :KeralaकेरळMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर