Join us  

'विरुष्का'चं मुंबईत ग्रँड रिसेप्शन, सेलिब्रिटींची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 10:58 PM

1 / 10
मुंबई : नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.
2 / 10
मुंबईतील लोअर परेलच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
3 / 10
यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यान विराट कोहलीने जोधपुरी स्टाईलचा व्हेल्वेट सूट, तर अनुष्का शर्माने सोनेरी वेलबुट्टीचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता.
4 / 10
या रिसेप्शन सोहळ्याला टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्यासह माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते.
5 / 10
तसेच जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादव, एम एस धोनी यांच्यासह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली आहे.
6 / 10
दुसरीकडे बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, ऐश्वर्या रॉय-बच्चन, माधुरी दीक्षित, ए.आर. रेहमान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
7 / 10
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले.
8 / 10
त्यानंतर त्यांनी मागच्या आठवडयात दिल्लीमध्ये विवाहाचा पहिला रिसेप्शन सोहळा पार पडला होता.
9 / 10
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. रिसेप्शनच्या एकदिवस आधी विराट कोहली आणि अनुष्काने नरेंद्र मोदींची भेट घेऊन रिसेप्शनचे निमंत्रण दिले होते.
10 / 10
दरम्यान, मुंबईतील या रिसेप्शनला सुरुवात होण्याआधी विराट आणि अनुष्का ही देखणी जोडी मीडियाच्या कॅमेऱ्यांना सामोरी गेली.
टॅग्स :Virushkaविरूष्काMumbaiमुंबईVirushka Weddingविरूष्का वेडिंगVirat Anushka Weddingविराट अनुष्का लग्नVirat Kohliविराट कोहली