Join us  

वापरा 'या' हटके आणि स्टायलिश Eco Friendly बॅग्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:52 PM

1 / 8
Single Use Plasticचा वापर करण्यास 2 ऑक्टोबर 2019 पासून बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच मार्केटमधून अशा प्लॉस्टिक बॅग गायब होत आहेत. सर्वसामान्य नागरिक भाजी, फळे, किराणा आदीं वस्तूंची खरेदी करण्यासाठी अशा प्लॉस्टिक बॅगचा वापर करत होते. मात्र, आता बंदीनंतर नागरिक कॉटन बॅग, कॅन्व्हस बॅग, जूट बॅग अशा बॅगचा वापर करु शकतात.
2 / 8
कॉटन बॅग : कॉटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेली ही बॅग स्टाईलमध्ये मिळत आहे. ही बॅग तयार करण्यासाठी पातळ कापड आणि जाड असलेले कापड वापरण्यात आले आहे.
3 / 8
कॅन्व्हस बॅग : कॉटन बॅगच्या तुलनेत कॅन्व्हस बॅग जास्त मजबूत असते. या बॅगेतून बटाटे, कांदे, दूध यासारख्या वजनदार वस्तू आपण आणू शकता. ही बॅग फाटण्याची शक्यता कमी असते.
4 / 8
जूट बॅग : जूट बॅग ट्रेंडमध्ये आहे. मार्केटमध्ये आपल्याला अनेक स्टायलिश जूट बॅग मिळतील. या बॅगमधून तुम्ही केवळ भाजी किंवा ग्रोसरी खरेदी करण्यासाठी वापर करू शकता.
5 / 8
बांबू बॅग : बांबूपासून तयार करण्यात आलेल्या बॅग थोड्या वजनदार आहे. या बॅग घेताना शक्यतो उन्हाळात वापरायला चांगल्या आहेत.
6 / 8
डेनिम बॅग : डेनिमपासून तयार करण्यात आलेल्या बॅग टिकावासाठी मजबूत असतात.
7 / 8
पेपर बॅग : प्लॉस्टिकच्या ऐवजी पेपर बॅग आपण वापरू शकता. पेपर बॅगेत जास्त वजन असलेले साहित्य घेऊन जाता येत नाही. हलक्या वस्तू नेण्यासाठी पेपर बॅगचा वापर होऊ शकतो.
8 / 8
बायॉडिग्रेडेबल प्लॉस्टिक बॅग : मार्केटमध्ये बायॉडिग्रेडेबल प्लॉस्टिक बॅग उपलब्ध आहेत. या बॅगपासून निसर्गाला नुकसान पोहोचत नाही. त्यामुळे सिंगल यूज प्लॉस्टिक बॅगला हा पर्याय चांगला आहे.