1 / 4अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी चौपाटयांवर घाण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असते. ते दृश्य पाहून प्रचंड त्रास होतो. त्यामुळे नियमित वॉकला जाणारेही दुस-या दिवशी चौपाटीवर जाणे टाळतात. 2 / 4गणेशविसर्जनानंतर अनेक स्वयंसेवी संस्था स्वत: पुढाकार घेऊन चौपाटयांवर सफाई अभियान हाती घेतात. 3 / 4महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हवाई कर्मचारी सेनेनेही आज बुधवारी दादर शिवाजी पार्क चौपाटी आणि परिसरास सफाई अभियान राबवले. 4 / 4मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई स्वत: या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.