Join us  

मुंबईतील भेंडी बाजार इमारत दुर्घटना : बचावकार्य संपलं, 33 जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 3:51 PM

1 / 5
मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील हुसैनी इमारत दुर्घटनेत 33 जणांचा बळी गेला असून तर 17 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 24 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे.
2 / 5
पाकमोडिया स्ट्रीटवरील 117 वर्षे जुनी ही सहा मजली हुसैनी इमारत 31 ऑगस्टला सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली
3 / 5
दुर्घटनेनंतर आपापल्या वस्तूंचा शोध घेताना हुसैनी इमारतीतील रहिवासी
4 / 5
शुक्रवारी (31 ऑगस्टी) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास एनडीआरएफनं शेवटचा मृतदेह बाहेर काढला
5 / 5
दुर्घटनाग्रस्त हुसैनी इमारती शेजारील दावरवाला इमारतही कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे, या इमारतीलाही धोकादायक ठरवण्यात आलंय