Join us  

Aryan Khan Bail Rejected: "भारती सिंगकडे ८६ ग्रॅम ड्रग्स सापडूनही एकाच दिवसात जामीन, पण आर्यन अजूनही तुरुंगात"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 5:47 PM

1 / 10
आर्यन खान याला आज एनडीपीएस कोर्टानं जामीन नाकारला आहे. त्यामुळे आर्यनसमोर अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. आर्यन खानसह ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांची जामीन याचिका कोर्टानं फेटाळली आहे.
2 / 10
आर्यन खान प्रकरणात अभिनेता शाहरुख खानच्या पाठिंब्यासाठी अनेक सेलिब्रिटी समोर येत आहेत. आर्यन खानला आजही जामीन नाकारण्यात आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
3 / 10
कमाल आर खान यानं आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर केलेल्या ट्विटची आता जोरदार चर्चा होत आहे. 'आर्यन खानला जामीन नाकारणं हा तर सरळ सरळ छळवणुकीचा प्रकार आहे. ज्याच्याकडे कोणतंही ड्रग्ज सापडलेलं नाही असा व्यक्ती २० दिवसांहून अधिक काळ तुरुंगात कसा राहू शकतो?', असा सवाल कमाल आर खान यानं उपस्थित केला आहे.
4 / 10
'कॉमेडी क्वीन भारती सिंग हिच्याकडेही ८६ ग्रॅम ड्रग्ज सापडले होते. त्यावेळी भारतीला त्याच दिवशी जामीन मिळाला होता. दोन वेगवेगळ्या व्यक्तींना दोन वेगवेगळे नियम लावले जात आहेत', असंही कमाल आर खान यानं म्हटलं आहे.
5 / 10
अभिनेत्री मीरा चोप्रा हिनंही आर्यन खानला जामीन नाकारण्यात आल्यावर दु:ख व्यक्त केलं आहे. याशिवाय तेहसीन पुनावालानंही आर्यन खानला पाठिंबा दिला आहे. 'आर्यन खानला जामीन नाकारण्यात आला. हा घोर अन्याय आणि छळवणुकीचा प्रकार आहे. आर्यननं हायकोर्टात याची दाद मागावी', असं तेहसीन पुनावालानं म्हटलं आहे.
6 / 10
एनडीपीएस कोर्टानं आजही आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं त्याला आता आणखी काही दिवस तुरुंगातच राहावं लागणार आहे. कोर्टाच्या आजच्या सुनावणीत कोणत्याही पक्षकारानं बाजू मांडली नाही. न्यायाधीशांनी आज थेट निकाल वाचन केलं आणि आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
7 / 10
कोर्टाच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढील पाऊल उचललं जाईल असं आर्यन खानच्या वकिलांनी सांगितलं आहे. दरम्यान, आर्यन खानकडून आता मुंबई हायकोर्टात दाद मागण्याची दाट शक्यता आहे.
8 / 10
एनसीबीच्या म्हणण्यानुसार अरबाज मर्चंट याच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत आणि आर्यन देखील त्याचं सेवन करणार होता. याशिवाय आर्य़नच्या मोबाइलमधून काही चॅट्स देखील समोर आले आहेत. ज्यात ड्रग्ज प्रकरणी परदेशी लिंक्स असल्याचा दावा एनसीबीनं केला आहे.
9 / 10
आर्यन खान परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची मागणी करत असल्याचं चॅट्समधून समोर आलं आहे. एनसीबीला यामागे ड्रग्जचं रॅकेट असल्याचं संशय आहे.
10 / 10
एनसीबीनं कोर्टासमोर आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचे काही पुरावे सादर केले आहेत. यात आर्यन बॉलीवूडमधील एका उदयोन्मुख अभिनेत्रीशी ड्रग्जच्या खरेदीबाबत संवाद साधत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय आर्यननं काही ड्रग्ज पेडलर सोबत केलेल्या चॅटिंगचेही पुरावे एनसीबीनं कोर्टाला दिले आहेत.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो