Join us  

लष्कराने अखेर उभारला करी रोडचा पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 3:13 PM

1 / 5
लष्करामार्फत आंबिवली, एल्फिन्स्टन-परळ पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, रविवारी करी रोड येथेही लष्कराने यशस्वीपणे पूल उभारला.
2 / 5
११ टप्प्यांमध्ये करी रोड येथील पूल उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले.
3 / 5
करी रोड येथील मोठ्या प्रमाणातील लोकल-एक्स्प्रेस यांची वाहतूक, मर्यादित जागा आणि वेळ, पुलाच्या बांधकामांचे साहित्य आणि मशिनरी यांची व्यवस्था अशी विविध आव्हाने या ठिकाणी होती.
4 / 5
मात्र, लष्कराने सुनियोजन, पूर्वतयारी यांच्या मदतीने आव्हाने पार केली. यासाठी लष्कराने आधुनिक पद्धतीने पुलाची बांधणी केली. तिन्ही ठिकाणी ३५० टन वजनी क्षमता असलेल्या क्रेनचा वापर करण्यात आला.
5 / 5
सध्या पूल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ पायºया आणि छताचे काम बाकी आहे. १० ते १५ दिवसांत करी रोड लष्करी पादचारी पुलाच्या पायºयांचे आणि छताचे काम पूर्ण करण्यात येईल.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Armyभारतीय जवान