Join us  

मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून प्रशासनाची लगबग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 1:48 AM

1 / 7
मान्सूनचा मुक्काम अद्यापही अंदमानातच असला तरी दुसरीकडे ऐन पावसाळ्यात अडचणी येऊ नयेत म्हणून मुंबई महापालिकेसह रेल्वे आणि उर्वरित प्राधिकरणांनी मान्सूनपूर्व कामांवर भर दिला आहे. (सर्व छायाचित्रे : दत्ता खेडेकर)
2 / 7
मुंबईमधील रस्त्यांची दुरुस्तीही सुरू झाली असून, पम्पिंग स्टेशनच्या कामांनीही गती घेतली आहे. रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी सुरू झाली आहे़
3 / 7
विशेषत: महापालिकेने मान्सूनपूर्व कामे वेगाने हाती घेतली आहेत. नालेसफाईच्या कामास प्राधान्य देण्यात आले असून, शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी या कामांनी वेग पकडला आहे.
4 / 7
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेदेखील मेट्रो-३ च्या कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी पावले उचलली आहेत.
5 / 7
रेल्वेलगतची छोटी गटारे साफ करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे.
6 / 7
मुंबई महापालिका मुख्यालयासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्यालयाच्या छताच्या दुरुस्तीने वेग पकडला आहे.
7 / 7
समुद्रात मासेमारीसाठी उतरलेल्या बोटीही आता किनारी लागल्या आहेत.