मुंबई : इंजिनीयरिंग किंवा सेल्फ फायनान्स कॉलेज म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते अभ्यासात पार बुडालेली ‘स्कॉलर स्टुडंट्स’. सध्या वर्सोव्याच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी (आरजीआयटी) कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मात्र स्पोटर््स, रॉकिंग म्युझिक आणि डीजेच्या दणकेबाजीमुळे जल्लोषाचे वातावरण असून निमित्त आहे ते आरजीआयटीच्या ‘झोडिएक’ या कॉलेजचे फेस्टचे.परफॉर्मिंग, इनफॉर्मल्स, लिटरेरी आर्ट, फाइन आर्ट आणि गेमिंग अशा ५ मुख्य विभागांत रंगणाऱ्या या स्पर्धेची ६ फेब्रुवारीपर्यंत रंगत रंगेल. मुंबईभरातील ४० हून अधिक कॉलेजेसचा सहभाग लाभलेल्या या फेस्टमधील प्रत्येक स्पर्धेत यंगिस्तानचा जल्लोष दिसून येत आहे. यावेळी आकर्षण ठरले ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या तब्बल दीड हजाराहून अधिक छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन. चिराग दोशी या २५ वर्षीय तरुणाने सचिनच्या बालपणापासून ते कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीपर्यंतच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. या प्रदर्शनाला यंगिस्तानची झालेली गर्दी पाहून आजही सचिनची क्रेझ तसूभरही कमी झाली नसल्याची खात्री पटली.परफॉर्मिंग विभागातील ‘कॉसप्ले’ स्पर्धा सर्वांनाच आपल्या बालपणात घेऊन गेली. प्रत्येकाला लहानपणी सुपरहीरो बनण्याची इच्छा असते. यासाठीच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांना कोणत्याही सुपरहीरोचा वेश करून येण्यास सांगून सुपरहीरो म्हणून मीच सर्वोत्तम कसा? हे सिद्ध करण्यास सांगितले. यावेळी विविध सुपरहीरोंना एकत्रित पाहताना यंगिस्तानने कल्ला केला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जीएस विनय देशमुख, अमित घुळे, स्पोटर््स सेक्रेटरी विकास इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या फेस्टमध्ये पुढील दोन दिवसांत विविध सेलीब्रेटींची उपस्थिती राहणार असल्याने ‘झोडिएक’मध्ये कॉलेजियन्सचा जल्लोष आणखी रंगेल. (प्रतिनिधी)च्पेंटिंग्स, पोस्टर मेकिंग, डीबेट, क्वीझ, जॅम, स्ट्रीट डान्स आणि सिंगिंग अशा नेहमीच्या स्पर्धांव्यतिरिक्त काही हटके स्पर्धांमुळे वेगळीच रंगत आली. यातील खाण्याची स्पर्धा म्हणजेच ‘होगॅथॉन’ चांगलीच रंगली. च्दिलेले खाद्यपदार्थ मर्यादित वेळेत लवकरात लवकर संपवण्याची लागलेली स्पर्धा पाहून एकच धम्माल उडाली. तर बॅलेन्स सायकलिंग स्पर्धेत चुरस रंगली. दुसऱ्या बाजूला एका बंद खोलीत रंगलेल्या ग्लो क्रिकेट स्पर्धेचा थरार चांगलाच भाव खाऊन गेला.
‘झोडिएक’ला दणक्यात सुरुवात
By admin | Updated: February 5, 2015 00:54 IST