Join us

अर्धवट कामे करणार्‍यांवर जि.प. गुन्हे दाखल करणार

By admin | Updated: May 31, 2014 01:25 IST

पाणीपुरवठ्यासह विकासकामे अर्धवट सोडून देणार्‍या ठेकेदारांसह संबंधित समितीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शेखर गायकवाड यांनी विभागाना दिले

ठाणे: पाणीपुरवठ्यासह विकासकामे अर्धवट सोडून देणार्‍या ठेकेदारांसह संबंधित समितीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शेखर गायकवाड यांनी विभागाना दिले. पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर कोट्यवधींचा खर्च झालेला आहे. बहुतांशी गावपाड्यांमध्ये विहिरी खोदलेल्या आहेत. पाण्याच्या टाकीसह पाइपलाइनची कामे काही ठिकाणी अर्धवट राहिली आहेत. यासाठी असलेला अर्ध्यापेक्षा जास्त निधी खर्चही झाला आहे. याचा अपहार झालेला असल्याचे उघड होताच संबंधित पाणीपुरवठा समितीवर गुन्हे दाखल करा, ठेकेदारांची ब्लॅकलिस्टमध्ये नोंद करण्याचे आदेश सीईओ यांनी दिले. याशिवाय, याआधी गुन्हे दाखल झालेल्यांचा अहवाल सादर करून त्यावर काय कारवाई झाली, आदींची माहिती देण्याचे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. (प्रतिनिधी)