Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे आर्थिक आरोग्य सुधारणार

By admin | Updated: August 6, 2014 00:39 IST

विविध ना-हरकत दाखल्यांच्या फीमध्ये वाढ : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच वाढ

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक ना-हरकत दाखल्यांच्या फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यामुळे उत्पन्नात तब्बल एक कोटीची वाढ होणार असल्याने जिल्हा परिषदेचे आर्थिक आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच ही वाढ होत आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कारखाना, स्टोन क्रशर, पेट्रोल पंप, बिगरशेती, औद्योगिक, वाणिज्य, निवासी, हॉटेल, खानावळ, स्वीटमार्ट बेकर्स, बिअर बार, परमिट रूम, देशी दारूचे दुकान, पोल्ट्री, रसपेय, पिठाची गिरणी, शीतपेय, आदी कारणांसाठी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ना-हरकत दाखले दिले जातात. त्याचबरोबर खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना ‘बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट १९४९’अंतर्गत शुश्रूषा व प्रसूतीसाठी नोंदणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत दिली जाते. यासाठी नाममात्र फी आकारली जात होती. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९६२ पासून हे दर तसेच होते. आजच्या आरोग्य समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन हे दर वाढविण्याची मागणी सदस्यांनी केली. (प्रतिनिधी)परवाना दाखला एकूण संख्यासध्याची फीवाढीव फीहॉटेल/खानावळ / शीतपेय गृह, तत्सम १३६६निरंक २०० ते ५०० रू.बिगर शेती २७६१० रूपये ५ हजार रूपयेकारखाना, स्टोन क्रेशर, पेट्रोल पंप१९१० रूपये१५ हजार रूपयेखासगी हॉस्पिटल रजिस्ट्रेशन दहा बेड६७३०० रूपये५ ते ७ हजार रूपये१० ते २० बेड पर्यंत१६६०० रूपये १० हजार रूपये २० बेड पेक्षा अधिक- ,, १५ हजार रूपये