सुरेश लोखंडे, ठाणेजिल्हा परिषद, ठाणे व पाच पंचायत समित्या अस्तित्वात आणण्यासाठी बुधवारी मतदान झाले. पण बहुतांशी गट व गणांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला असल्यामुळे केवळ चार गट व गणांच्या ठिकाणी निवडणूक होत आहे़ उर्वरित ठिकाणी सुमारे तीन महिन्यांनी होणाऱ्या आगामी निवडणुका या सार्वजनिक न होता पोटनिवडणुका होणार असल्याचे आताच्या या निवडणूक प्रक्रियेमुळे सिद्ध झाले आहे़जिल्ह्यातील ५५ गटांपैकी जिल्हा परिषदेच्या आसनगाव नाडगाव (ता. शहापूर) तर शिरवली आणि नारिवली (ता. मुरबाड) या केवळ चार गटांमध्ये निवडणूक होत आहे. तर सुमारे चार गटांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. उर्वरित सुमारे ४७ गटांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तेथील मतदान प्रकिया थांबवण्यात आली आहे. यातील काही ठिकाणी उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नाही. तर ज्या ठिकाणी अर्ज दाखल झाले तेथील उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेऊन सर्व पक्षीय बहिष्काराला पाठिंबा दिला. परंतु चार गट व चार गणातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे सुमारे तीन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यांच्या आत या ४७ गटामध्ये होणाऱ्या या निवडणुका आता पोट निवडणुका म्हणून घोषीत केल्या जाणार आहेत. अन्यथा निवडणूक आयोगाला या गटांमध्ये सार्वत्रिक निवडणूक म्हणून घोषीत करावी लागली असती.ही स्थिती कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी पंचायती समित्यांच्या गणांचीदेखील आहे. या पाच पंचायत समित्यांच्या ११० गणांपैकी सहा गणांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर कळंभ, (शहापूर), टोकावडे, शिवळे, देवगांव (ता. मुरबाड) या चार गणांमध्ये निवडणूक होत आहेत. यामुळे निवडणूक होत नसलेल्या १०० गणांमध्ये यानंतर होणारी निवडणूक सार्वत्रिक न होता पोटनिवडणूक म्हणून घोषीत केली जाणार आहे.
जि प., पं. समित्यांना अखेर पोटनिवडणूक अटळ
By admin | Updated: January 28, 2015 23:13 IST