Join us

सिडकोकडून सॅपसाठी ‘झेनसार’ची नेमणूक

By admin | Updated: July 4, 2015 01:16 IST

सिडकोने कामकाज अधिक गतिमान व पारदर्शी करण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून सॅप

नवी मुंबई : सिडकोने कामकाज अधिक गतिमान व पारदर्शी करण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून सॅप तंत्राच्या अंमलबजावणीसाठी झेनसार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता व परिणामकारकता येते, यामुळेच सिडकोने सॅपचा (सिस्टीम अ‍ॅप्लिकेशन प्रोग्राम) अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी झेनसारचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश नटराजन यांना कार्यादेश दिला. डिजिटल तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. या कायापालटाला सर्वार्थाने माणसांची मानसिकता कारणीभूत असते. परिस्थिती बदलेल आणि मी बदलाला सहाय्यभूत ठरेन, असे तंत्रज्ञानाचा वापर करणारी व्यक्ती ठरवते तेव्हा बदल सुकर होतात, असे मत यावेळी डॉ. डी. बी. फाटक यांनी व्यक्त केले. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कारभारात पारदर्शकता आणि सकारात्मकता येते. मागील दोन वर्षांत सिडकोमध्ये महत्त्वाचे बदल झाले असे ऐकल्याचे नटराजन यांनी सांगितले. कामकाजाची जुनी प्रक्रिया बदलण्यासाठी पुनर्मूल्यांकन आणि मूलभूतरीत्या पुनर्विचार करण्याची गरज आहे. सिडकोच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन या बदलाला हातभार लावण्याची गरज आहे. तसे झाल्यास सिडको नागरिकांना योग्य सेवा देऊ शकेल, असे मत यावेळी संजय भाटिया यांनी व्यक्त केले. बेलापूर किल्ले गावठाणमधील विश्रामगृहामध्ये झालेल्या कार्यादेश हस्तांतरण कार्यक्रमास सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे, संजीव गुप्ता, सिद्धार्थ गुप्ता, अजय सक्सेना, फैयाज खान, केशव वरखेडकर व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)