Join us

झवेरी बाजारातील दरोडा प्रकरण; उर्वरित ७ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 03:09 IST

झवेरी बाजारामधील सशस्त्र दरोड्याचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्यानंतर, एलटी मार्ग पोलिसांनी आणखी ७ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

मुंबई : झवेरी बाजारामधील सशस्त्र दरोड्याचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्यानंतर, एलटी मार्ग पोलिसांनी आणखी ७ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.झवेरी बाजारातील शेख मेमन स्ट्रीटवर असलेल्या सुतार चाळीच्या चौथ्या मजल्यावर, सोने कारागीर सौमण कारक यांचा दागिने घडविण्याचा कारखाना आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री कारक हे त्यांच्या सहा कारागिरांच्या मदतीने दागिने घडवत असताना, रात्री साडेअकराच्या सुमारास सात लुटारूंनी त्यांच्या कारखान्यात प्रवेश केला. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत, या लुटारूंनी कारक यांच्यासह सातही कारगिरांचे हात, पाय आणि तोंड चिकटपट्टीने बांधून ठेवले. यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून शनिवारी उर्वरित सात जणांना पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींकडून २६ लाख ७० हजार रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले.

टॅग्स :अटकमुंबई