मुंबई : आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणीच्या किंवा वाहन हस्तांतरणाच्या वेळी जोडल्या जाणाऱ्या जकात पावत्या भरल्याच्या म्ांूळ पावत्या बनावट असल्याची बाब परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे पावती सादर करुन घेण्याची जबाबदारी रद्द करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आला आहे.वाहन नोंदणी किंवा वाहन हस्तांतरण करताना वाहनधारकाकडून कागदपत्रांसह जकात पावत्या सादर केल्या जातात. मुळात जकात पावत्या तपासणी करण्याची जबाबदारी ही पालिकेच्या जकात विभागाची आहे. परंतु हे काम करताना अनेकदा जकात पावत्या बनावट असल्याचे निदर्शनास येते. याबाबत परिवहन आयुक्य कार्यालयाकडून ३ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात सादर जकात पावत्या बनावट असल्याची बाब निदर्शनास येत आहे. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार वाहन नोंदणी करताना जकात भरल्याची पावती जोडण्याची तरतुद नसतानाही पावत्या नोेंदणी कागदपत्रांसोबत स्कॅन केल्या जातात. तसेच बनावट जकात पावत्या तपासण्याची जबाबदारी परिवहन कार्यालयाची नाही. तरीही याबाबत या कार्यालयाचा संबंध नसतानाही विनाकारण सहभाग असल्याचे चित्र निर्माण होऊन परिवहन कार्यालयाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता असल्याचे यातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाहन नोंदणीच्या वेळी जकात पावत्यांची मागणी करु नये व त्या वाहनाच्या मूळ कागदपत्रांमध्ये समाविष्ट करु नयेत, असे आदेश सर्व आरटीओंना परिवहन विभागाने दिल्याचे परिवहन उपायुक्त पुरुषोत्तम निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नोंदणीत सादर केलेल्या जकात पावत्या बनावट
By admin | Updated: February 4, 2015 02:41 IST