Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची चाकूने भोसकून हत्या

By admin | Updated: June 16, 2015 01:38 IST

पूर्ववैमनस्यातून रविवारी चेंबूर कॅम्प परिसरात पाच जणांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

मुंबई : पूर्ववैमनस्यातून रविवारी चेंबूर कॅम्प परिसरात पाच जणांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.गणेश घाडीगावकर (३६) असे मृताचे नाव असून तो चेंबूर कॅम्प परिसरातील रामटेकडी येथे राहत होता. याच परिसरातील काही तरुणांसोबत त्याचे तीन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. यावेळी त्याने एका तरुणाला मारहाण केली होती. याचाच राग आरोपींच्या मनात होता. काल मध्यरात्री गणेश घराकडे जात असताना राज हॉटेल परिसरात पुन्हा त्याचे आरोपींशी भांडण झाले. याचवेळी आरोपींनी चाकूने गणेशवर अनेक वार केले. त्यात गणेश जखमी अवस्थेत रस्त्यालगत पडला होता. काही रहिवाशांनी तत्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत कमलेश तडकर (२४), सागर साळवे (१९) आणि बिट्टू (२६) या तीन आरोपींना तातडीने अटक केली तर त्यांच्या दोन साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)