Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉम्बेमध्ये तरुणाची हत्या

By admin | Updated: May 31, 2015 02:05 IST

पूर्ववैमनस्यातून एका अनोळखी इसमाने आदम शेख (३०) या तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ट्रॉम्बे येथे घडली आहे. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मुंबई : पूर्ववैमनस्यातून एका अनोळखी इसमाने आदम शेख (३०) या तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ट्रॉम्बे येथे घडली आहे. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.ट्रॉम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरात राहणाऱ्या या तरुणाचा याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांसोबत अनेक दिवसांपासून वाद होता. आज पहाटे एका अनोळखी इसमाने आदमच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली. त्याच्या कुटुंबीयांना ही बाब समजताच त्यांनी तत्काळ त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे. (प्रतिनिधी)