Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: February 21, 2016 01:55 IST

एका अल्पवयीन विवाहितेने आपल्या घरात गळफास लावून घेतल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील साईगाव येथे घडली. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच

बदलापूर : एका अल्पवयीन विवाहितेने आपल्या घरात गळफास लावून घेतल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील साईगाव येथे घडली. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूमुळे संतप्त झालेल्या पित्याने रुग्णालयातच जावयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तीनच महिन्यांपूर्वी सचिन धांडे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता. तिचा मृत्यू झाल्याचे कळताच तिचे वडील राजा पडियाची हे दवाखान्यातच कोयता घेऊन जावयामागे धावले. या वेळी डॉ. कीर्तिकुमार करे यांच्या हाताला दुखापत झाली. यासंबंधी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी.एस. पोरे हे अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी सचिन धांडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. त्या महिलेला रुग्णालयात आणतानाच तिचा मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.