Join us

पोलिसांमुळे वाचले तरुणीचे प्राण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:06 IST

गच्चीवरुन आत्महत्येचा प्रयत्न, ताडदेव मधील घटनाआत्महत्येसाठी इमारतीच्या गच्चीवर चढलेल्या तरुणीचे पोलिसांनी वाचविले प्राणताडदेवमधील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्क...

गच्चीवरुन आत्महत्येचा प्रयत्न, ताडदेव मधील घटना

आत्महत्येसाठी इमारतीच्या गच्चीवर चढलेल्या तरुणीचे पोलिसांनी वाचविले प्राण

ताडदेवमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इमारतीच्या गच्चीवर चढून एक तरुणी आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचा कॉल येताच ताडदेव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणीला बोलण्यात गुंतविले आणि तोपर्यंत अन्य सहकाऱ्यांनी तिला पाठीमागून जाऊन पकडले. पोलिसांच्या या प्रसंगावधानामुळे १९ वर्षीय तरुणीचे प्राण वाचले.

पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आठच्या सुमारास एक तरुणी म्हाडाच्या चार मजली इमारतीच्या गच्चीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी देत हाेती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलीस ठाण्याजवळच असलेल्या या इमारतीकडे पाेलिसांच्या पथकाने तत्काळ धाव घेतली. तरुणीचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही पोलिसांनी तिला बोलण्यात गुंतवले, तोपर्यंत अन्य पाेलीस लगतच्या इमारतीवरून गच्चीच्या दिशेने गेले आणि संधी मिळताच तरुणीला ताब्यात घेतले.

त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. त्यावेळी सहा महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले असून घरगुती समस्यांंना कंटाळून तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समजले. ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी घटनेला दुजोरा देत तरुणीचे समुपदेशन केल्याचे सांगितले. ........................