Join us

चेंबूरमध्ये तरुणीवर मित्रांकडून बलात्कार दोघांना बेड्या

By मनीषा म्हात्रे | Updated: November 19, 2023 19:31 IST

याबाबत चेंबूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे. 

मुंबई:  चेंबूरमध्ये शितपेयातून गुंगीचे औषध देत शेजारी राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे. 

 पीडित तरुणी काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात वडील राहत असलेल्या घरी आली होती. शुक्रवारी तरुणी घरात एकटीच असताना शेजारी राहणारा तरुण तिच्या घरी काही कामानिमित्त आला होता. तरुणीच्या ओळखीचा असल्याने तिने त्याला घरात घेतले. त्यानंतर त्याचा आणखी एक मित्र तरुणीच्या घरी आला. यावेळी आरोपींनी तिला शितपेयातून गुंगीचे औषध दिले. 

दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिला समजताच तिने तत्काळ चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी  सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत  दोन्ही आरोपीना अटक केली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करत आहे.