Join us

'तरुणांसमोर योग्य आदर्श ठेवायला हवा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 05:13 IST

भारत आता तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपली युवाशक्ती खरी ताकद आहे.

मुंबई : भारत आता तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपली युवाशक्ती खरी ताकद आहे. मात्र युवकांसमोर योग्य आदर्श निर्माण व्हायला हवा, असे प्रतिपादन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले. मुंबईत एनसीपीएच्या टाटा थिएटरमध्ये झालेल्या ‘इन कॉन्वर्सेशन विथ द मिस्टिक’ या संवादाच्या नवीन श्रुंखलेत बुधवारी सद्गुरूंनी दिलखुलास उत्तरे दिली. प्रख्यात अभिनेत्री कंगना राणावतने त्यांची मुलाखत घेतली. कंगनाच्या फिरकी घेणाऱ्या प्रश्नांनाही सद्गुरूंनी त्यांच्या नर्मविनोदी शैलीत उत्तरे दिली.तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगनाने सद्गुरूंना यावेळी राजकीय, अध्यात्मिक, सामाजिक, सिनेमा, क्रीडा, राजकारण अशा विविध विषयांवर बोलते केले. भारतातील अर्थव्यवस्थेवर सद्गुरूंनी यावेळी विस्तृत विवेचन केले. जगात भारत आता महत्वाचा देश म्हणून गणला जातोय. आपल्या देशाच्या अर्थक्रांतीकडे साºया जगाचे बारीक लक्ष असते. भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करतोय, यात युवा पिढीचे महत्त्वाचे आहे. युवा वर्ग प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतोय. भारतीय सिनेमासाठी कंगना ही एक देणगी आहे. कारण तिने वेगळ््या वाटेवरचा सिनेमा निवडला आणि आपल्या अभिनयाने यशस्वीही करून दाखविला. अशा तमाम युवावर्गाचा मला अभिमान वाटतो. सद्गुरूंच्या खुमासदार उत्तरांना उपस्थितांनी टाळ््यांच्या कडकडाटात दाद दिली. या संवाद श्रृखंलेला लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.