मुंबई : फ्रि वे वरून भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा एक टायर फुटल्याने कार उलटून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय कार चालक तरूण सुखरूप बचावल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. त्याने सीट बेल्ट लावला असल्यामुळे तो बचावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी शिवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास फ्रि वे च्या दक्षिण वाहिनीवरुन कार चालक राजेश विरजी पटेल हा कारने भरधाव वेगाने जात होता. (प्रतिनिधी)
सीट बेल्टमुळे अपघातातून तरुण बचावला
By admin | Updated: February 18, 2017 04:29 IST