मुंबई : देशातील सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसला व युवक काँग्रेसला मजबूत करण्याची गरज आहे. येणारा काळ देशातील नागरिकांसाठी अधिक अडचणींचा ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. काँग्रेसला देशात सर्वाधिक सदस्य नोंदणी करून मुंबईला प्रथम क्रमांक मिळवून द्या, असे आवाहन करत, संघर्षाच्या काळात सर्व तरुण काँग्रेससोबत आहेत, असा आशावाद युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व पंजाब विधानसभेचे आमदार अमरिंदर सिंग राजा ब्रार यांनी व्यक्त केला.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर युवक काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला अमरिंदर सिंग राजा ब्रार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला, या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व मुंबईचे प्रभारी रित्विक जोशी आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव उपस्थित होते. राजा ब्रार म्हणाले की, ‘२८ दिवस हे युवक काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान सुरू राहाणार आहे. तेव्हा सगळ्यांनी मिळून जास्तीतजास्त सदस्य नोंदणी करा़ मनापासून काम करा.’ (प्रतिनिधी)
तरुण काँग्रेससोबत आहेत
By admin | Updated: March 30, 2017 07:17 IST