दीपक मोहिते, वसईवसई-विरार भागात ‘आपचा ताप’ आता कमी होत आहे. दोन वर्षापूर्वी आंदोलने तसेच निषेध मोर्चा काढणारे नेते आता राजकीय पटलावरून दूर झाले आहेत. आम आदमी पार्टीची स्थापना झाल्यानंतर अनेकांनी ती मध्ये प्रवेश घेतला. मात्र लोकसभा निवडणुकींमध्ये पालघरच्या उमेदवाराला २० हजार मतांचा पल्लाही गाठता आला नव्हता. ही परिस्थिती लक्षात घेऊन आपने विधानसभा, त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचे टाळले.सतत होणारी पिछेहाट व कार्यकर्त्यांची गळती अशा दोन कारणांमुळे जूनमध्ये होणाऱ्या वसई-विरार शहर मनपाच्या निवडणुका आपकडून लढवल्या जाण्याची शक्यता आता कमी आहे. विविध राजकीय पक्षांतील नाराज कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या या पक्षाने कधी बाळसं धरलेच नाही. पक्षाला बळकटी देणारे नेतृत्वच उभे न राहिल्यामुळे पक्ष क्षीण होत गेला. सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेण्याऐवजी राष्ट्रीयस्तरावरील प्रश्नावर मोर्चे, आंदोलनामुळे स्थानिक दुरावले. अशीच परिस्थिती मनसेबाबतही निर्माण झाली. मुंबईतील आंदोलनाचे पडसाद या परिसरात काही प्रमाणात उमटायचे. परंतु त्याचा प्रभाव जनमानसांवर पडायचा नाही. महानगरपालिका निवडणुकींची कुणकूण लागताच मूठभर कार्यकर्त्यांनी हंडेमोर्चे काढण्यास सुरुवात केली. मागील काही वर्षांपासून पाणीटंचाई असताना मोर्चे निघाले नाहीत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे सुरू झाले. उपप्रदेशामध्ये विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याची कारणे अपुरी पडत आहेत. मनपा प्रशासन अतिरिक्त पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात प्रयत्नशील आहे. परंतु या मार्गात त्यांना अडथळ्यांच्या शर्यतीत तोंड द्यावे लागत आहे. अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केल्यास मनसेची सामान्यांमध्ये प्रतिमा उंचाऊ शकते. परंतु स्थापनेनंतर ७ वर्षात उपप्रदेशात मनसे बळकट होऊ शकली नाही. उलट काही पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडली, हे वास्तव आहे. मनसैनिकांचा ओघ सेनेतअनेक पदाधिकारी आता सेनेच्या डेऱ्यामध्ये दाखल झाले आहेत. ते सेनेच्या तिकिटावर उभे राहिले तर, आश्चर्य वाटता काम नये. मनसे तरुणांचा पक्ष असला तरी, जुन्या जाणत्यांची उणीव त्यांना सतत भासणार आहे. स्थानिक नेतृत्व साकारलेच नाहीआज उपप्रदेशामध्ये प्रभावीरित्या नेतृत्व करणारे व्यक्तीमत्व मनसेकडे नाही. त्यामुळे एकसंघ कधीच पहावयास मिळाला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यावेळी मिळालेली मते लक्षात घेता मतदारांनी साफ नाकारल्याचे दिसून आले. पक्ष बांधणीकडे मुंबईतील नेत्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे येथे नवनिर्माण होऊ शकला नाही. पक्षाची सद्यस्थिती लक्षात घेता महानगरपालिका निवडणुका लढवणे अशक्य आहे. अनेक स्वयंघोषित नेते निवडणुका लढविण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. मात्र त्यांना स्थानिक मतदारांचा प्रतिसाद मिळेल का, हा प्रश्न आहे.
आप, मनसेचे अस्तित्व नाममात्र
By admin | Updated: May 7, 2015 00:13 IST