Join us  

तुम्ही तर तत्पर आहात, कंगना प्रकरणावरुन हायकोर्टाने BMC ला फटकारलं

By महेश गलांडे | Published: September 24, 2020 2:29 PM

तसं पाहिलं तर आपण अतिशय तत्पर आहात, पण जेव्हा तुमच्यावर आरोप लागले जातात, त्यावेळी तुम्ही पावलं मागे घेतात, असेही न्यायाधीश म्हणाले. याप्रकरणी उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी करण्यात येणार आहे

ठळक मुद्देतसं पाहिलं तर आपण अतिशय तत्पर आहात, पण जेव्हा तुमच्यावर आरोप लागले जातात, त्यावेळी तुम्ही पावलं मागे घेतात, असेही न्यायाधीश म्हणाले. याप्रकरणी उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी करण्यात येणार आहे

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालय तोडफोड प्रकरणाचा खटला मुंबईउच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाने मुंबईतील इमारत दुर्घटनेवरुन मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. कंगनाप्रकरणी उत्तर देण्यासाठी बीएमसीच्या वकिलांनी 2 दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यामुळे, न्यायाधीश कठावडा भडकले, एखाद्याचं घर तोडण्यात आलंय. मग, पावसाळ्याच्या वातावरणात त्या घराला असंच पडीक ठेवता येणार नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले. 

तसं पाहिलं तर आपण अतिशय तत्पर आहात, पण जेव्हा तुमच्यावर आरोप लागले जातात, त्यावेळी तुम्ही पावलं मागे घेतात, असेही न्यायाधीश म्हणाले. याप्रकरणी उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत आहे. आता, भिंवडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून कंगनाने हल्लाबोल केला आहे.

बेकायदेशीररित्या माझे घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिले असते तर ५० जणांचे जीव वाचले असते, असे कंगनाने म्हटले आहे.यासंदर्भात कंगनाने ट्विट केले आहे. ती म्हणाली, "उद्धव ठाकरे, संजय राऊत, मुंबई महानगरपालिका ज्यावेळी माझे घर बेकायदेशीर पद्धतीने तोडत होते. त्यावेळी या इमारतीकडे लक्ष दिले असते तर आज हे जवळपास ५० लोक जिवंत असते. एवढे जवान तर पुलवामा, पाकिस्तानमध्ये मारले नाहीत, तेवढे आपल्या निष्काळजीमुळे मरण पावले. मुंबईचे काय होईल देवाला ठाऊक?"

कंगनाकडून शिवसेनेवर सातत्याने टीका

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर उघडपणे बोलणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले होते. तसेच, मुंबईची तुलना पीओकेशी (पाकव्यप्त काश्मीर) केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत येऊ नये, असे म्हटले होते. यावरून कंगना विरूद्ध शिवसेना वादाचे नाट्यही रंगले होते. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकाम तोडले आहे.

मुंबई पालिकेच्या या कारवाईमुळे कंगना कमालीची भडकली असून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मुंबई पालिकेवर टीका करत आहे. याआधीही कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी "उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझे घर तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझे घर तोडले आहे. उद्या तुझा गर्व तुटेल," अशी टीका कंगनाने केली होती. 

टॅग्स :मुंबईकंगना राणौतउच्च न्यायालय