Join us  

धावत्या लोकलमध्ये योग प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 5:15 AM

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने शहरातील वाहतुकीचे प्रमुख माध्यम असलेल्या रेल्वेमध्ये देखील योगदिनाचा उत्साह दिसून आला.

मुंबई : आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने शहरातील वाहतुकीचे प्रमुख माध्यम असलेल्या रेल्वेमध्ये देखील योगदिनाचा उत्साह दिसून आला. योगदिनाच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेने २० सदस्यांची ट्रेन ट्रेनर्स टीम स्थापन करून धावत्या लोकलमध्ये योग प्रात्यक्षिके सादर केली.शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षित अशा २० योग शिक्षकांच्या टीमने पश्चिम रेल्वेवरील धावत्या लोकलमध्ये योगांची प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी प्रवाशांनीही सोपे आसने करत योगदिनामध्ये आपला सहभाग नोंदवला. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासह मुंबई सेंट्रल, आरपीएफ लॉबी, अंधेरी येथील रेल्वे कार्यालयांमध्येही योग प्रात्यक्षिके सादर केली.मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात रेल्वे कर्मचाऱ्यांसह आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी निर्मल पार्क येथे योग प्रात्यक्षिके सादर करत योगदिन उत्साहात साजरा केला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी चर्चगेट येथील मुख्यालय परिसरात योगाची प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग प्रात्यक्षिके केली.

टॅग्स :योग