जेनेलिया डिसुजा गर्भवती असून रितेश देशमुख बाप बनणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर रितेशने स्वत: या गोष्टीची कबुली दिली आहे. रितेशने दिलेल्या एका मुलाखतीत जेनेलिया गर्भवती असून त्यामुळे आमचे सर्व कुटुंब सध्या प्रचंड आनंदी असल्याचे म्हटले आहे. रितेशने सांगितले की, पत्नी असण्याबरोबरच जेनेलिया माझी सर्वात चांगली मैत्रीणही आहे. आमच्या दोघांचे विचार खूप जुळतात. त्यामुळे आमच्यात कधी भांडण होत नाही. जेनेलिया गर्भवती असल्याने केवळ आम्ही दोघेच नाही, तर आमचे सर्व कुटुंब प्रचंड आनंदी असून येणा:या बाळाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
होय मी बाप बनतोय
By admin | Updated: June 8, 2014 01:22 IST