मुंबई : म्हाडाच्या घराच्या वाढत्या किंमतीबाबत आघाडी सरकारविरोधात टीकेचा आसूड ओढणाऱ्या भाजपा-शिवसेनेला आता जणू विसर पडलेला आहे. इतकेच नव्हे तर महागड्या घराबाबत एक पाऊल पुढे टाकलेले आहे. यावर्षी घराच्या किमती कमी होण्याऐवजी त्यात सरासरी ८ ते १५ हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्या सरकारकडे आशा लावून बसलेल्या मुंबईकरांच्या तोडाला पाने पुसली आहेत.म्हाडाच्यावतीने या वर्षी मुंबईतील ९८९ व विरारमधील अडीच हजारांवर घरांसाठी ३१ मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई मंडळाने सोडत काढावयाच्या घरांच्या किमतीची निश्चिती करण्यात आलेली असून, गोरेगाव उन्नतीनगर येथील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील घरासाठी अनुक्रमे २० लाख ८३ हजार व २८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर प्रतीक्षानगरातील मध्यम उत्पन्न गटासाठीच्या घराची किंमत ३७ लाख ५३ हजार इतकी निश्चित करण्यात आलेली आहे.गेल्या वर्षीच्या सोडतीतील घराच्या किमती सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने आघाडी सरकारवर सर्व स्तरांतून टीका झालेली होती. त्यामध्ये विरोधी पक्ष आघाडीवर होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनंतर घराच्या बांधकाम खर्चावरील व्याजाची आकारणी १४.५ टक्क्यांऐवजी १०.५० टक्के करण्यात आली होती. निवडणुकीमध्ये भाजपा व सेनेने स्वतंत्रपणे काढलेल्या जाहीरनाम्यांत मुंबईत परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता हाती आल्यानंतर त्यांना वचनाचा विसर पडला असल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)मुंबईतील घरांच्या प्रस्तावित किमती संकेतयोजनाउत्पन्न गट सदनिकाकार्पेट एरियाकिंमतक्रमांक (मीटर)३१० प्रतीक्षा नगर सायनमध्यम५६ ४०.६०३७,५३,६४०३११मानखुर्दअत्यल्प ६६२८.४३२५,७८,१००३१२ गव्हाणपाडा, मुलुंडमध्यम१८५४४.४३५९,००,९४२३१३ गवाणपाडाअत्यल्प१७४ -- --३१४मालवणी अल्प६४२७.८७२०,३४,६०१३१५मालवणीअल्प१६८२७.८७२०,३४,६०१३१६उन्नतीनगर, गोरेगावअल्प१८२२८.१५२७,९९,८५०३१७उन्नतीनगरअत्यल्प९४२५.०२२०,८३,१५०२०१४ मध्ये सोडत काढलेल्या घराच्या किमतीयोजनाउत्पन्न गटसदनिकाकिंमतमानखुर्दअत्यल्प२३५१५,५७६००विनोबा भावे नगरअल्प२०७१९,३१,५००प्रतीक्षा नगरमध्यम५६ २९,३२,३००मागाठाणेअत्यल्प६२१३,९७,०००शैलेंद्र नगरउच्च८६ ७७,२४,१००कोले कल्याणउच्च५१७६,२७,६००तुंगवा, पवईमध्यम९४८,२८,०००तुंगवा पवईउच्च१०८७४,३३,०००
यंदा म्हाडाची घरे महागच
By admin | Updated: March 26, 2015 01:54 IST