मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार या वर्षी कृषी औद्योगिक समाजरचना / व्यवस्थापन प्रशासन क्षेत्रत भरीव कामगिरी करणारे सुप्रसिद्ध शेतकरी व कृषी क्षेत्रतील विचारवंत शरद जोशी यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, 25 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. 2 लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शरद जोशी यांनी गेली अनेक वर्षे शेतीचे अर्थकारण व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी संघर्ष केला आहे. (प्रतिनिधी)
शरद जोशींना यशवंतराव चव्हाण पुरस्कार
By admin | Updated: October 17, 2014 01:33 IST