Join us  

एक्स-रे व्हॅनमार्फत कोरोनाबाधितांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 3:57 AM

एक्स-रेमध्ये संशयित रुग्णाच्या फुप्फुसांमधील संसर्गाचे प्रमाण दिसून येते. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर अन्य जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये रुग्णांचे एक्स-रे काढून बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले.

शेफाली परब - पंडित ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांचा अहवाल झटपट मिळण्यासाठी महापालिकेने गेल्या महिन्यापासून अँटिजन चाचणी सुरू केली. त्याचबरोबर आता थेट संशयित रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढून संसर्गाचे निदान तत्काळ करण्यात येणार आहे.

आतापर्यंत कोविड केअर सेंटरमधील संशयित आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांचे एक्स-रे काढण्यात येत होते. मुंबईत अशा सात एक्स-रे व्हॅन बाधित क्षेत्रांमध्ये रुग्णांचा शोध घेणार आहेत. मुंबईत आतापर्यंत आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत होती. मात्र या चाचणीचा अहवाल येण्यासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे अर्ध्या तासात अहवाल देणाऱ्या अँटिजन चाचणीचा वापर महापालिकेने गेल्या महिन्यात सुरू केला. त्याचबरोबर वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडियाच्या विलगीकरण कक्षात एक्स-रे मशीनचा वापर सुरू करण्यात आला.

एक्स-रेमध्ये संशयित रुग्णाच्या फुप्फुसांमधील संसर्गाचे प्रमाण दिसून येते. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर अन्य जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये रुग्णांचे एक्स-रे काढून बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. लक्षणे नसलेल्या रुग्णांचेच नव्हे तर चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या रुग्णांचे एक्स-रे काढून त्यांच्यामध्ये विषाणू असल्यास दिसून येत आहे. त्यामुळे चाचणीबरोबरच हा प्रयोगही रुग्णांना शोधण्यास प्रभावी ठरत आहे. संशयित रुग्णाचा एक्स-रे काढल्यानंतर पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्याची तपासणी केली जाणार आहे. त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात येतील.काही बाधित क्षेत्रांमध्ये नियमित फिव्हर कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. तेथे येणाºया संशयित रुग्णांचे एक्स-रे प्राधान्याने काढण्यात येतील़मुंबईतील सात परिमंडळात एक्स रे व्हॅन सुरू करण्यात आल्या आहेत. या व्हॅनचा वापर कुठे आणि कसा करावा? याचे नियोजन संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांमार्फत करण्यात येईल. त्या रुग्णांचे एक्स रे रेडिओलॉजिस्टकडे पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये संसर्ग दिसून आलेल्या रुग्णावर उपचार सुरू करण्यात येणार आहे. - सुरेश काकाणी,अतिरिक्त महापालिका आयुक्त

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस