Join us  

बीएमएसची पेपरफुटीसंदर्भात विद्यापीठ सतर्क व महाविद्यालयाकडून गुन्हा नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 8:09 PM

मुंबई :  आज सकाळच्या सत्रात एकूण 32  परीक्षांचे 158 पेपरच्या परीक्षा आयोजित केल्या होत्या. यात BMS सेमिस्टर 5 चा Marketing : E - Commence & Digital Marketing या विषयाचा पेपर होता.

मुंबई :  आज सकाळच्या सत्रात एकूण 32  परीक्षांचे 158 पेपरच्या परीक्षा आयोजित केल्या होत्या. यात BMS सेमिस्टर 5 चा Marketing : E - Commence & Digital Marketing या विषयाचा पेपर होता. दुपारी 11.45  मिनिटांनी अंधेरी पश्चिम येथील MVM College of Commerce & Science या महाविद्यालयात BMS च्या एका  विद्यार्थिनीकडे मोबाईल असल्याचे ज्युनियर सुपरवायझरला आढळून आला. या मोबाईलमध्ये आजची प्रश्नपत्रिका आढळून आली.

सदर घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यापीठास दिली. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यांनी या महाविद्यालयास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले आणि विद्यापीठाची एक समिती तात्काळ या महाविद्यालयास पाठविली. विद्यापीठ सतर्क होते.या सर्व गोष्टीवर बारकाईने नजर ठेवून होते, म्हणूनच विद्यापीठाने तातडीने एक समिती महाविद्यालयास पाठविली. यानुसार महाविद्यालयाने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा ३ ऑक्टोबर २०१७ पासून सुरळीतपणे सुरू झाल्या. बीएमएस सेमिस्टर ५ ची परीक्षा दिनांक १३ नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे.या परीक्षेचे पहिले तीन पेपर दिनांक १३, १४ व १५ नोव्हेंबर २०१७ या दिवशी सकाळी ११ ते १.३० वाजता या वेळेत १६३ परीक्षा केंद्रावर झाले, व सदर परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे. 

विद्यापीठाची प्रश्नपत्रिकाची इ डिलिव्हरी (DEPDS) मार्फत होत असते व यामध्ये अनेक सुरक्षात्मक बाबी आहेत. तसेच ज्या महाविद्यालयात ही प्रश्नपत्रिका डाउनलोड केली जाते त्या महाविद्यालयाचे नाव वॉटरमार्क स्वरूपात प्रिंट होते. यामुळे कोणत्या महाविद्यालयातुन ही प्रश्नपत्रिका प्रिंट झाली हे तात्काळ समजते.- विनोद माळाळे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :मुंबईविद्यापीठ