Join us  

चिंताजनक! राज्यात ५० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 5:47 AM

चार वयोगटांतील रुग्ण दोन लाखांच्या पुढे; ३१ ते ४० वयोगटांत सर्वाधिक रुग्ण

स्नेहा मोरे ।

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १३ लाखांच्या घरात आहे, तर जवळपास चार वयोगटांतील कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्याही पुढे आहे. चिंताजनक बाब म्हणजे, नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या तब्बल ५० हजारांहून अधिक लहानग्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालाच्या अहवालानुसार समोर आले आहे. ही रुग्णसंख्या ५० हजार ४३८ असून एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.७८ टक्के आहे.राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ३१ ते ४० वयोगटांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण २ लाख ८८ हजार ५९८ रुग्ण आढळले. टक्केवारीत हे प्रमाण २१.३४ इतके आहे.

त्याखालोखाल, ४१ ते ५० वयोगटांत २ लाख ४२ हजार ७ (१७.९० टक्के), २१ ते ३० वयोगटांत २ लाख ३० हजार १४४ (१७.०२ टक्के), तर ५१ ते ६० वयोगटांत २ लाख १५ हजार ५०० (१५.९४ टक्के) रुग्णांना कोरोनाची लागण झाली. ११ ते २० या वयोगटांतीलही ९३ हजार ३१६ मुलामुलींना कोरोनाचे निदान झाले आहे.ज्येष्ठ नागरिकांना (९१ ते १०० वर्षे) होणाऱ्या संसर्गातही झपाट्याने वाढ होऊन हे प्रमाण २ हजार ३७८ वर पोहोचले आहे, तर १०१ ते ११० वयोगटांतील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात नमूद आहे.पालकांनी खबरदारी घेणे गरजेचेराज्यात १८ जून रोजी नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ३ हजार ८६६ बालकांना कोरोना झाला होता. १८ मे रोजी हे प्रमाण १ हजार ५९ इतके होते. याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. क्षितिजा खडपे यांनी सांगितले, बालकांना होणाºया कोरोना संसर्गात वाढ होत असून यात लक्षणेविरहित बालकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याविषयी पालकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईडॉक्टर