लोकमत ‘रिअॅलिटी चेक’ : फडवणीस सरकार संवेदनशीलता दाखवणार का?टीम लोकमत - मुंबईमाझ्या मुलाने आयुष्यातील प्रत्येक स्पर्धा जिंकून मोठे व्हावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते़ पण या दृढ इच्छेला व्यसनरूपी राक्षस कायमाचा अधू करतो़ या भयावह राक्षसाला किमान विद्या मंदिराच्या आवारातून तरी हद्दपार करावे, यासाठी ‘टीम लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. मुंबईतल्या शाळांना लागून असलेल्या पान टपऱ्यांचे ‘रिअॅलिटी चेक’ करण्याचे ठरवले.अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ देऊ नये, असा कायदा आहे़ शाळेच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासही मनाई आहे़ मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे ‘टीम लोकमत’ने घेतलेल्या ‘रिअॅलिटी चेक’मधून स्पष्ट झाले़माजी गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी तंबाखूविरोधी कायदा पुढच्या अधिवेशनात आणण्याची घोषणा केली़पण शाळेच्या आवारातच व्यसनांची साधने अगदी सहज उपलब्ध होत असल्यास अशा घोषणांचा कितपत उपयोग होणार, हे नव्याने सांगायला नको़ त्यामुळे शाळा व पालकांनी या पान टपऱ्यांना हद्दपार करण्याचे प्रयत्न केले, तरच खऱ्या अर्थाने व्यसनमुक्ती होऊ शकेल. या प्रश्नी फडवणीस सरकार संवेदनशीलता दाखवणार का, असा सवालही आता उपस्थित होत आहे. विषण्ण वास्तव....मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेज क्र . २ महापालिका हिंदी शाळेला लागून असलेल्या पानटपरीतून शाळकरी मुलींनी तंबाखू घेतली. घेतलेली तंबाखू त्यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींना दाखवली.
कोवळ््या मनांना व्यसनांनी वेढले!
By admin | Updated: February 21, 2015 03:57 IST