Join us
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक प्रदर्शनात श्रीलंका टी बोर्ड करणार हॅट्ट्रिक

By admin | Updated: May 5, 2017 03:29 IST

येथे नाव्हेंबर महिन्यात होणाऱ्या जागतिक चहा-कॉफी प्रदर्शनात सहभागी होऊन श्रीलंका टी बोर्ड

मुंबई : येथे नाव्हेंबर महिन्यात होणाऱ्या जागतिक चहा-कॉफी प्रदर्शनात सहभागी होऊन श्रीलंका टी बोर्ड यंदा हॅट्ट्रिक साधणार आहे. बोर्डाने या वार्षिक प्रदर्शनासाठी पॅव्हेलियन बुक केले आहे. श्रीलंकेतील कंपन्यांचा या प्रदर्शनातील सहभाग वाढत असून, त्यामुळे या देशातील ब्रँड लोकांपर्यंत पोहोचत आहे. तसेच चहा, कॉफी आणि संबंधित क्षेत्रात होणाऱ्या नवीन तंत्रज्ञान विषयक सुधारणा एका छताखाली उपलब्ध होतात. त्याचा फायदाही कंपन्यांना होतो, असे श्रीलंका टी बोर्डाचे अध्यक्ष रोहन पेथीयोगाडा यांनी सांगितले.