Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रंगणार जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा

By admin | Updated: September 17, 2014 01:00 IST

जगातल्या बॉडीबिल्डर्सना पाहायची संधी मुंबईकरांना मि. वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.

मुंबई : जगातल्या बॉडीबिल्डर्सना पाहायची संधी मुंबईकरांना मि. वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. 7 ते 9 डिसेंबरमध्ये रंगणा:या या शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत जगातील 4क्क् पेक्षा अधिक पुरुष आणि महिला शरीरसौष्ठवपटूंचा थरार अनुभवता येईल. ही स्पर्धा गोरेगाव येथील मुंबई एक्ङिाबिशन सेंटरमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचे आयोजन इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनने केले आहे.
मि. वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होणा:या स्पर्धकांचे एकूण 35 गट असतील. हे खेळाडू मुख्य स्पर्धेसह उत्तम शरीरसौष्ठवपटू, आदर्श शरीरयष्टी. अॅथलेटिक शरीर आणि क्रीडा शरीरयष्टी या स्पर्धाही होणार आहेत. पुरुष स्पर्धक खुल्या गटाव्यतिरिक्त ज्यूनियर्स (21 वर्षाखालील) आणि मास्टर्स (4क्-49 वर्ष, 5क्-59 वर्ष आणि 6क्-69 वर्ष) या गटात सहभाग घेऊ शकतात. 
या स्पर्धेच्या निमित्ताने भारताचे दोन संघ आपले कौशल्य पणाला लावतील. त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळाडूंशी दोन हात करण्याची संधी मिळेल, असे फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सांगितले. 
तसेच भारतातील सेनादल, नौदल, रेल्वे, महाराष्ट्र, पंजाब अशा 29 संलग्न राज्य आणि सरकारी संस्थांमधील खेळाडूंनी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केल्याचेही पाठारे यांनी सांगितले. तर अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना एक मंच मिळणार असल्याचे आयोजन समितीचे अध्यक्ष मधुकर तळवलकर यांनी सांगितले. 
शरीरसौष्ठव खेळाची व्याप्ती वाढवण्याची उत्तम संधी या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध होईल, असे जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे अध्यक्ष प्रदीप मधोक यांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)